विधानसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशचे 39, छत्तीसगडचे 21 उमेदवार जाहीर : पाच राज्यांमध्ये वर्षअखेरीस निवडणुका होणार.राजस्थान, तेलंगणामधील उमेदवारही ठरवणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मध्य प्रदेशसाठी 39 आणि छत्तीसगडसाठी 21 उमेदवार जाहीर केले आहेत. या वषीच दोन्ही राज्यांत निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच पहिली यादी जाहीर करून भाजपने आपली आक्रमक रणनीती स्पष्ट केली आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये येत्या काही महिन्यात निवडणुका होणार आहेत. भाजपची सत्ता फक्त मध्य प्रदेशात आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तर तेलंगणात बीआरएसची सत्ता आहे. पाच राज्यांतील निवडणुका भाजपसाठी आगामी लोकसभा निवडणुकीची ‘सेमीफायनल’ असल्याचे मानले जाते. भाजपने पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा घोषित होण्याआधीच केंद्रीय निवडणूक समितीची बैठक घेऊन मध्य प्रदेश व छत्तीसगढमधील अनुक्रमे 39 व 21 उमेदवारांची पहिली यादी गुऊवारी जाहीर केली. आता राजस्थान व तेलंगणामधील उमेदवारांची यादीही तुलनेत लवकर जाहीर केली जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. कर्नाटकमध्ये केलेली धोरणात्मक चूक दुऊस्त करण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचे मानले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रणनितीमध्ये बदल करण्यामागे स्थानिक नेत्यांना निवडणुकीच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळावा हे प्रमुख कारण आहे. शिवाय, कर्नाटकमध्ये केवळ मोदी लाटेचा प्रभाव पडू न शकल्याने आता उमेदवाराची ताकद आणि जातीचे गणित असे दुहेरी समीकरण जुळवून उमेदवारांची निवड केली जात आहे. त्यामुळेच भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी सल्लामसलत करत थेट उमेदवारांची घोषणा करत आघाडी घेतली आहे.
केंद्रीय निवडणूक समितीची बैठक
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बुधवारी नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात झाली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी बैठकीतील चर्चेत भाग घेतला. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. न•ा यांच्यासह भाजपचे अनेक बडे नेते उपस्थित होते. यावेळी मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. सीईसी सदस्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या तयारीचाही आढावा घेतला.
मतदारसंघनिहाय सविस्तर चाचपणी
केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत छत्तीसगडमधील राजकीय स्थितीवर चर्चा झाली. यादरम्यान राज्यातील 90 विधानसभा जागांवर टप्प्याटप्प्याने चर्चा झाली. सुमारे दोन तास छत्तीसगडबाबत चर्चा झाली. यानंतर मध्य प्रदेशचीही चर्चा झाली. पक्षाच्या हायकमांडचे लक्ष प्रामुख्याने संवेदनशील जागांवर असल्याचे सूत्रांनी सांगितले. मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या 230 जागा तर, छत्तीसगडमध्ये 90 जागा आहेत. विजयाच्या शक्मयतेनुसार या मतदारसंघांची चार श्रेणीत विभागणी केली आहे. ‘अ’ श्रेणीत भाजपचे बालेकिल्ले मानले जाणारे मतदारसंघ, ‘ब’ श्रेणीत एखाद-दोन वेळा पराभव झालेले मतदारसंघ, ‘क’ श्रेणीत पराभवाची शक्मयता जास्त असलेले मतदारसंघ तर, ‘ड’ श्रेणीमध्ये भाजपसाठी अत्यंत कमकुवत व सातत्याने पराभव झालेल्या मतदारसंघांचा समावेश करण्यात आला आहे.









