ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भाजपचा खरा चेहरा भ्रष्टाचारी आहे, हे आता जनतेच्या समोर आले आहे. मागच्या वेळी भाजप लिंगायत समाजाच्या जोरावर निवडून आलं आणि त्यांनाच वाऱ्यावर सोडलं. त्यामुळे आता तिथल्या जनतेने भाजपला नाकारलं, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती यायला सुरूवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पटोले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. पटोले म्हणाले, आतापर्यंत समोर आलेले कल पाहता काँग्रेस 124 जागांवर आघाडीवर आहे. 124 पेक्षाही जास्त जागा काँग्रेसला येतील. भाजपचा खरा भ्रष्टाचारी चेहरा जनतेसमोर आला आहे. राहुल गांधींवर खोटा आरोप लावून त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्याचे पाप भाजपने केलं आहे. त्यांना बेघर केले. मात्र, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला मानण्याची देशात सुरुवात झाली आहे.
राहुल गांधीकडे आम्ही पंतप्रधान म्हणून पाहतोय. राहुल गांधी शिकलेले आहेत आत्ताचे पंतप्रधान किती शिकले मला माहित नाही, असाही टोला त्यांनी या वेळी मोदींना लगावला.








