खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांचे प्रत्युत्तर
मडगाव : लोकसभा निवडणुकीत मुजरा, मंगलसूत्र, घुस्पेट अशा शब्दाचा वापर करून भाजपने जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा प्रयत्न फसल्याने आता धर्मगुरूंवर आरोप केले जात असल्याचे प्रत्युत्तर खा. कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी दिले. ‘पाद्री’मुळे दक्षिण गोव्यात भाजपचा पराभव झाल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. यावर खा. विरियातो यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, त्यांनी वरील विधान केले. दक्षिण गोव्यात भाजपचा पराभव झाला, तो त्यांनी कृपापूर्वक स्वीकारला पाहिजे होता. दक्षिण गोव्यात भाजपने प्रचंड पैसा खर्च केला, सर्व मशिनरीचा वापर केला तरीही त्यांचा पराभव झाला. हा पराभव कृपापूर्वक स्वीकारणे त्यांना शक्य झालेले नाही, त्यांनी तो पराभव स्वीकारावा व पुढे जावे असे विरियातो म्हणाले.









