माजी पंतप्रधानांच्या आठवणींना दिला उजाळा
बेळगाव : भारतीय जनता पार्टीच्यावतीने मंगळवारी ‘अटल विरासत’ संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा देण्यासोबतच जिल्ह्यातील 70 हून अधिक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाला बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर व जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील उपस्थित होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या बालपणापासून राजकीय जीवनापर्यंतचा लघुपट स्क्रीनवर दाखविण्यात आला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे मुत्सद्देगिरी व दूरदृष्टीने देशाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्याचे खासदारांनी सांगितले. यावेळी माजी आमदार संजय पाटील, महांतेश दोड्डगौडर, महानगर अध्यक्षा गीता सुतार, आमदार विठ्ठल हलगेकर, माजी खासदार मंगला अंगडी यांच्यासह महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, डॉ. सोनाली सरनोबत यासह इतर उपस्थित होते.









