वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात मतदानानंतर झालेल्या हिंसाचारात भाजपच्या एका कार्यकर्त्याची काही लोकांनी हत्या केली. या हत्येचा आरोप भाजपने तृणमूल काँग्रेसवर केला आहे. मात्र, कौटुंबिक कलहातून ही हत्या झाल्याचा दावा तृणमूल काँग्रेसने केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कालीगंजमध्ये घडली. भाजपचा कार्यकर्ता हफिजूर शेख शनिवारी रात्री पॅरम खेळत होता. याचदरम्यान दुचाकींवरून आलेल्या 10-12 जणांच्या टोळक्याने सुरुवातीला शेखवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर चाकूने वार करून त्याची हत्या केली. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. संबंधित हल्लेखोर सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.









