ब्लॅकमेलिंग झाल्याचा आल्याचा संशय
वृत्तसंस्था/ सूरत
गुजरातच्या सूरत येथील भाजपच्या महिला नेत्याने आत्महत्या केली आहे. दीपिका पटेल असे या महिलेचे नाव असून तिने घरात गळफास घेत स्वत:चे आयुष्य संपविले आहे. पोलीस आता दीपिका पटेलच्या मोबाइलचा कॉल डिटेल पडताळून पाहत आहेत.
34 वर्षीय दीपिका या सूरतच्या अलथाण भागात राहत होत्या. दीपिका विवाहित होत्या आणि त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. दीपिका या भाजपशी सक्रीय स्वरुपात जोडल्या गेल्या होत्या. दीपिका पटेल यांच्या घराबाहेरील सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांनी मिळविले आहे. दीपिकाने आत्महत्येपूर्वी सूरतचे नगरसेवक चिराग सोलंकी यांना कॉल केला होता अशी माहिती समोर आली आहे.
दीपिका यांनी अखेरच्या कॉलमध्ये आपण आत्महत्या करत असल्याचे चिराग यांना सांगितले होते. यानंतर चिराग सोलंकी यांनी तातडीने त्यांच्या घरी धाव घेतली होती. तर पोलिसांनी परिवाराच्या आरोपानंतर भाजप नगरसेवकाची तीन तासापर्यंत चौकशी केली आहे. दीपिकाला कुणी ब्लॅकमेल करत होते का याची चौकशी पोलीस करत आहेत.









