आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Asembly Election) एकूण 224 जागांपैकी 140 जागांवर काँग्रेस (Congress) विजयी होण्याचा अंदाज सर्वेक्षणांनी दर्शविल्याचा कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (DK Shivkumar) यांनी, भाजपचा आकडा 65 च्या पुढे जाणार नसून तो कदाचित 40 जागांपर्यंत खाली येऊ शकतो. असे म्हटले आहे. तसेच भाजप सरकारविरोधात राज्यभरातील सर्व लोक संतप्त असल्याचा दावाही त्यांनी केला.
माध्यमांशी बोलताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष डिके शिवकुमार म्हणाले, “आम्हाला आमच्या संख्येची हमी असून भाजपचा आकडा 65 च्या पुढे जाणार नाही याची हमी आहे. भाजपचे अंतर्गत काय चालु आहे ही त्यांची बाब आहे. येडियुरप्पांनी त्यांच्या हिशोबानुसार 140 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे सांगितले त्यावर मला काही बोलायचे नाही.” असे बोलताना भाजपला वाट्टेल ते करू द्या, पण ते ६०- ६५ च्या पुढे जाऊ शकणार नसल्याचेही म्हटले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, “माझ्या मते भाजपची संख्या 40 पर्यंत खाली आली तर विषेश नाही. त्यामुळे ’40 टक्के कमिशन भाजप सरकार’ 40 जागांवर आल्यास आश्चर्य वाटणार नाही, लोक इतके संतप्त आहेत, तुम्ही ज्याला पाहिजे त्याला कुठेही विचारा.’ असेही ते म्हणाले.