राज्याच्या पक्षसंघटनेत होणार मोठा बदल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजपला फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यानुसार जानेवारीच्या मध्यापर्यंत निम्म्या राज्यांमधील पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. राज्यांमध्ये देखील 60 टक्के प्रदेशाध्यक्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत नवा अध्यक्ष नियुक्त केला जाऊ शकतो असे या पदाधिकाऱ्याने सांगितले आहे. जगतप्रकाश न•ा हे 2020 पासून भाजपचे अध्यक्ष आहेत. याचबरोबर ते केंद्रात आरोग्य मंत्री देखील आहेत.
फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत भाजपचे नवे अध्यक्ष पदग्रहण करू शकतात. नवा अध्यक्ष हा केंद्र सरकारमधील मंत्रीही असू शकतो किंवा संघटनेतून एखाद्याची या पदावर निवड होऊ शकते. यावर कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही. सर्वसाधारणपणे भाजप अध्यक्षाचा कार्यकाळ तीन वर्षांचाच असतो. परंतु 2024 ची लोकसभा निवडणूक पाहता न•ांचा कार्यकाळ वाढविण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीत यश मिळवत भाजपने सत्ता राखली होती.
भाजपमध्ये अध्यक्षपदावरून मंथन दीर्घकाळापासून सुरू आहे. ऑगस्टमध्ये देखील यासंबंधी विचारविनिमय झाला होता, परंतु त्यावेळी महाराष्ट्र, झारखंड आणि जम्मू-काश्मीर तसेच हरियाणाची निवडणूक नजीक आली होती. अशा स्थितीत जैसे थे स्थिती राखण्याचाच निर्णय घेण्यात आला होता. 2014 मध्ये केंद्रात पूर्ण बहुमतातील मोदी सरकार स्थापन झाल्यावर अमित शाह यांना तीन वर्षांसाठी पक्षाध्यक्ष करण्यात आले होते.
पक्षाच्या घटनेनुसार पक्षाचा किमान 15 वर्षे सदस्य राहिलेला व्यक्तीच अध्यक्ष होऊ शकतो. यापूर्वी 2010-13 पर्यंत पक्षसंघटनेची धुरा नितिन गडकरी यांच्याकडे होती. राजनाथ सिंह हे 2005-09 पर्यंत आणि मग 2013-14 पर्यंत भाजपचे अध्यक्ष राहिले आहेत. 2014-200 पर्यंत अमित शाह यांनी पक्षाचे नेतृत्व केले होते.









