महाराष्ट्रभर शिवसेनेते पदाधिकारी-नेते प्रत्येक जिल्ह्यात जाऊन संवाद साधत आहेत. ‘शिवगर्जना’ ही संकल्पना शेवटच्या स्थरापर्यंत पोहचवत आहेत. सध्या महाराष्ट्रात चोर मंडळामुळे वातावरण बिघडले आहे. आज आमच्या पक्षाचे नाव, चिन्ह नाही. पण महाराष्ट्रात जाऊ तिकेड आधीच्यापेक्षा जादा उत्साह आहे. हेच चित्र मला कोल्हापिरात दिसलं. एकंदरीत महापालिका, लोकसभा, विधानसभा सभागृहात गद्दार तुम्हाला दिसणार नाहीत. हा ठाम निश्चय जनतेचा आणि शिवसेनेचा मला दिसतो. भाजपचा बुडबुडेचा फुगा फुटेल.
कसबा-चिंचवड निवडणुकीत भाजपची हार होणार आहे. डुप्लीकेट शिवसेनेच्या पाठीमागे कोण असणार आहे याचा बुरखा लवकरच फाटेल. दोन्ही मतदार संघात मविआचाच विजय होणार. यापुढे राज्यात कोणतीही निवडणुक होऊदे डुप्लीकेट शिवसेनेचा पराभवच होणार. भाजपच पराभव करण्य़ाचे लोकांनी ठरवले आहे. मी विधिमंडळाला चोर मंडळ म्हटल नाही. अलिबाबा आणि 40 चोरांचं मंडळ अस म्हटल्याचेही ते म्हणाले.
Previous Articleभाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार; कसब्यात काँग्रेसचे धंगेकर विजयी
Next Article मिऱ्या किनारी कचऱ्याचे साम्राज्य








