भाजपचे दक्षिण कन्नडचे खासदार नळीनकुमार कठील यांनी आज प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून राजकीय चर्चाना उधाण आले आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवाची नैतिक जवाबदारी स्वीकारून आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
बळ्ळारी येथे आयोजित एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आपला प्रदेशाध्यक्षपदाचा संपला असून पक्ष श्रेष्टींकडून नव्या अध्यक्षांची नेमणूक करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. काँग्रेसची राज्यात एक हाती सत्ता आली. आता २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षात फेरबदलाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.









