BJP SpokesPerson Keshav Upadhyay : मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण होत आहेत. शासनाचे सुशासनात रूपांतर होण्याचा यशस्वी प्रयत्न आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला योजनेचा लाभ मिळतोय हे मोदी सरकारचे प्रयत्न आहेत.नऊ वर्षात देशातील रस्त्याचे जाळे बदलले आहे. विरोधक एकत्र आलेल्या सर्व पार्टी या खासगी आहेत.या सर्व कौटुंबिक पार्टी आहेत.यांच्याकडे ना विकासाचा विचार आहे, ना राष्ट्राचा विचार .स्वतःच्या कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न सुरु असल्याची टीका भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. आज ते कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्यावर चर्चा केली.
आज तेलंगनाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या उपस्थित राष्ट्रवादीचे भालचंद भालके आणि कार्यकर्ते बीआरमध्ये प्रवेश करणार आहेत. तसेच केसीआर यांनी पंढपूर दर्शनावेळी शक्तिप्रदर्शन केल्याचा फ्रयत्न केला अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बीआरएस ही भाजपची ‘बी’ टीम असल्याचं म्हटलं होतं. याविषी बोलताना केशव उपाध्ये म्हणाले की, संजय राऊत यांनी आधी स्वतःच बघावं.प्रकाश आंबेडकर हे औरंगजेबच्या कबरिवर जातात. त्यावर उद्धव ठाकरे बोलत नाहीत.राष्ट्रवादी,काँग्रेस शांत आहे. त्यामुळे बी टीम कोणाची आहे हे कळते, असा टोलाही लगावला. एमआयएमने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे असंही मत त्यांनी व्यक्त केलं.
काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की, काँग्रेसल ना गणित कळतं ना कोणता त्यांचा अभ्यास आहे . ज्या पध्दतीने गेल्या 9 वर्षात योजना कार्यान्वित झाल्या.त्याचे परिणाम प्रत्यक्ष लोकांना दिसू लागले आहेत. काँग्रेसच्या काळात देशाची अर्थव्यवस्था 9 व्या नंबरवर होती.आज देशाची अर्थव्यवस्था 5 व्या नंबरवर आणण्याचे काम मोदींनी केलं आहे.त्यामुळे काँग्रेसकडे टीका करण्यासारखं आता काहीचं राहिलं नाही.त्यामुळे ते काहीही विषय काढतात, अशी टीका त्यांनी यावेळी केली.








