संघाच्या विचाराच्या काँग्रेस विरोधात
वृत्तसंस्था/ आइजोल
काँग्रेस खासदार राहुल गांधी हे सध्या दोन मिझोराम दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी राहुल यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली आहे. यानंतर त्यांनी एका पत्रकार परिषदेला संबोधित पेले आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाविषयी एक वेगळा विचार बाळगून आहेत. भाजप भारताच्या संस्थात्मक चौकटीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राहुल यांनी यावेळी केला आहे.
भारत हा राज्यांचा संघ असून येथे सर्व संस्कृती, सर्व धर्म, सर्वांचा इतिहास जतन करण्याची गरज असल्याचे आमचे मानणे आहे. काँग्रेसने देशाच्या मूलभूत चौकटीच्या निर्मितीत योगदान देत ती टिकविण्याचा प्रयत्न नेहमीच केला असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. मिझोराम दौऱ्यादरम्यान राहुल यांनी राज्यातील तरुणाईला स्वत:सोबत जोडण्याचा प्रयत्न केला आहे. सोमवारी संध्याकाळी त्यांनी आइजोलच्या तरुणाईशी संवाद साधला.
मिझोरामला भेट देणे मला पसंत आहे. सोमवारच्या पदयात्रेत आइजोलच्या लोकांनी मोठा पाठिंबा दिला. भारत जोडो यात्रेच्या थीमवर आम्ही ही पदयात्रा काढली होती. भाजप-संघाला मिझोराममध्ये स्वत:चा प्रभाव निर्माण करण्यासाठी झेडपीएम-एमएनएफ मदत करत आहे. परंतु काँग्रेस कधीच असे करणार नाही, कारण आमची विचारसरणी त्यांच्यापेक्षा अत्यंत वेगळी असल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.
भाजपची धोरणे ही लघू अन् मध्यम उद्योग संपविण्यासाठी तयार करण्यात आली आहेत. अदान आणि 3-4 मोठ्या उद्योजकांना लाभ मिळवून देण्यासाठी अणि छोट्या व्यापाऱ्यांना धक्का पोहोचविण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. जीएसटी लागू करत कृषी कायदे आणले गेले होते असा आरोप राहुल यांनी केला आहे.









