भाजप युवा मोर्चा अध्यक्ष समीर मांद्रेकर यांचा आरोप
म्हापसा : दक्षिण गोव्याचे आमदार विजय सरदेसाई उठसुट काहीही विधाने करून लागले आहेत. भाजपची विकासकामे व पुढील विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपचा विजय निश्चित असल्याचे कळल्यावर ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांविरोधात नाहक काहीही विधाने करीत असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चा अध्यक्ष समीर मांद्रेकर यांनी म्हापसा येथे पत्रकार परिषदेत केला. 2017 मध्ये विधानसभा निवडणुकीवेळी प्रचार करताना विजय सरदेसाई भाजप विरोधात विधाने केली होती. मात्र निकालानंतर मंत्रीपदाची ऑफर मिळाल्यावर ते आपल्या दोन्ही आमदारांना सोबत घेऊन भाजपबरोबर सत्तेत राहिले. त्यावेळी त्यांना भाजप वाईट दिसला नाही. आज ते सत्तेबाहेर असल्याने काहीही विधाने करीत आहेत, असे मांद्रेकर म्हणाले.
राज्यात विकासकामांची गंगा आली
भापचे कार्य आज उत्कृष्टरित्या चाललेले आहे. प्रत्येक मतदारसंघात विकासकामे चालली आहेत. आज आमदार, मंत्री प्रत्येक मतदारसंघात न्याय देत आहेत. युवा पिढीसाढी आज सरकारने विविध खात्यात नोकऱ्या काढल्या आहेत. हे सरदेसाईंना पहावत नाही. ते याविरुद्ध तक्रार करणार असल्याचे सांगत आहेत. मात्र त्यात काही साध्य होणार नसल्याचे मांद्रेकर यांनी सांगितले. सरदेसाई यांच्या विधानांना राज्यातील जनतेने बळी पडून नये, असे आवाहन दक्षिण गोवा युवा मोर्चाचे अध्यक्ष उर्वेश रेडकर यांनी केले आहे.









