लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशात 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकवार घवघवीत यश मिळविण्याची योजना भाजप सिद्ध करीत आहे. यासाठी भाजपने सव्वा वर्ष आधीपासूनच सज्जता करण्यास प्रारंभ केला आहे. राज्याच्या तीन ते चार लोकसबा मतदारसंघांचे एक क्षेत्र निर्माण करण्यात आले असून या क्षेत्राचे उत्तरदायित्व एका केंद्रीय मंत्र्याकडे देण्यात येणार आहे. विशेषतः ज्या लोकसभा मतदारसंघांमध्ये गेल्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे, त्या जागा खेचण्यासाठी या योजनेवर विशेष भर दिला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
या राज्याच्या भाजपने जिंकलेल्या 66 लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून केंद्रीय उपमंत्री किंवा राज्यमंत्र्यांची नियुक्ती निवडणूक सज्जतेसाठी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे पुरेशा संख्यग्नेने पदाधिकारी आणि विस्तारकांची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी उत्तरदायित्व स्वीकारणाऱयांची एक सूची सज्ज केली जात असून ती येत्या चार दिवसांमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे.
माध्यम विभागाची पुनर्रचना होणार
प्रत्यक्ष मतदारसंघांचा विचार करण्यापूर्वी भाजपकडून प्रसारमाध्यम विभागाची पुनर्रचना केली जाणार आहे. नव्या रक्ताला संधी दिली जाणार असून माध्यम विभाग अधिक बळकट करण्यावर भर दिला जाईल. माध्यमांचे महत्व पक्षाने नेहमीच ओळखले असून आगाम्ंााr लोकसभा निवडणुकीच्या आधीं हा विभाग अधिक दक्ष आणि सजग करण्याकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाणार आहे.
नवे अध्यक्ष लागले कामाला
भाजपने उत्तर प्रदेशची धुरा सध्या भूपेंद्र चौधरी यांच्याकडे सोपविल्नी आहे. चौधरींनी दीड वर्ष आधीपासूनच आपल्या कार्याला प्रारंभ केला असून प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्त्यांची अभेद्य फळी निर्माण करण्याचे कार्य हाती घेतले आहे. प्रत्येक मतदान केंद्राचे उत्तरदायित्व विशिष्ट कार्यकर्त्यांच्या हाती सोपविले जाईल. सर्व कार्यकर्ते आणि नेते यांच्या उत्कृष्ट संपर्क रहावा यासाठी प्रयत्न होतील.









