कोल्हापुरात भाजपकडून भव्य किल्ले बांधणी स्पर्धा
कोल्हापूर : भाजपतर्फे भव्य किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन केले आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून २२ ते २६ ऑक्टोबर दरम्यान स्पर्धा होईल. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास तब्बल १ लाखांचे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शहरातील ८१ प्रभागातंर्गत ही स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेमध्ये युनेस्को अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश स्पर्धकांनी करणे बंधनकारक आहे. रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी, जिंजी आदी किल्ल्यांचा युनेस्कोमध्ये समावेश आहे.
स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकास १ लाख, द्वितीय क्रमांकास ७५ हजार आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस ५० हजार रुपये आहे. २३ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. तरी शहरातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी भाजपा जिल्हा कार्यालय नागाळा पार्क येथे शंतनु मोहिते ९६६९७६६९५५ शिवरत्न मेटिल ७६२०४१७६६७ यांच्याशी संपर्क साधावा.








