बेळगाव उत्तरचे भाजप उमेदवार डॉ. रवी पाटील यांनी मंगळवारी सकाळी विनायकनगर फर्स्ट आणि सेकेंड स्टेजमध्ये प्रचाराला सुरुवात केली. नागरिकांच्या घरोघरी जाऊन भाजपला मतदान करण्याचे त्यांनी आवाहन केले.
विविध संघटना, महिला मंडळांनी त्यांना आपला पाठिंबा दर्शविला. येथील नागरिकांच्या समस्या निवारण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
आपण वैद्यकीय क्षेत्रात मोठे कार्य केले असून यापुढेही नागरिकांच्या सेवेत सदैव राहो असे यावेळी सांगितले.
प्रचारादरम्यान महिलांनी त्यांचे औक्षण करीत स्वागत केले तर वयस्कर महिलांनी त्यांना आशीर्वाद दिला. भाजप हा विकासात्मक राजकारण करणारा पक्ष असून देशाच्या भरीव योगदानासाठी पक्ष बळकट होणे गरजेचे आहे.
राज्यात तसेच देशात भाजपचे सरकार असेल तरच देशाची शक्ती वाढेल, असे मत डॉ. रवी पाटील यांनी व्यक्त करत मला बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.












