अमरावती :
भाजपने आंध्रप्रदेश विधान परिषदेच्या एका जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी स्वत:चा उमेदवार जाहीर केला आहे. पक्षाने अनुभवी नेते सोमू वीरराजू यांना उमेदवारी दिली आहे. सोमू वीरराजू यांनी आंध्रप्रदेशात भाजपला मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच ते राज्याच्या राजकारणात दीर्घकाळापासून सक्रीय आहेत आणि त्यांनी पक्ष संघटनेत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलेले आहे. भाजप कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा चांगला प्रभाव आहे. वीरराजू यांच्या उमेदवारीमुळे पक्षाला मजबुती मिळेल आणि आगामी निवडणुकांमध्ये याचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल असा भाजप नेतृत्वाला विश्वास आहे. आंधप्रदेश विधान परिषदेची ही जागा राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या निवडणुकीतील भाजपची कामगिरी भविष्यातील राजकीय रणनीतिला देखील प्रभावित करू शकते. राज्यात भाजप स्वत:चे संघटन मजबूत करू पाहत आहे. या निवडणुकीतील भाजपची भागीदारी या दिशेने आणखी एक पाऊल मानण्यात येत आहे.









