सोनभद्र:
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी उत्तरप्रदेशातील दुद्धी मतदारसंघाचे भाजप आमदार रामदुलार गोंड यांना एमपी/एमएलए न्यायालयाने 25 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच न्यायालयाने गोंड यांना 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला. याप्रकरणी न्यायालयाने 12 डिसेंबर रोजी गोंड यांना दोषी ठरविले होते. 25 वर्षांची शिक्षा झाल्याने गोंड यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द होणार आहे. भाजप आमदाराकडून सुनावणीदरम्यान पीडितेला तडजोड करण्यासाठी पैशांचे आमिष दाखविण्यात आले होते, तसेच अनेक प्रकारे धमकाविण्यात देखील आले होते. आमदार गोंडने विवाहित पीडितेच्या सासरी जात तेथेही धमकी दिली होती. तसेच स्वत:च्या पदाचा वापर करत अनेकप्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पीडिता स्वत:च्या आरोपावर ठाम राहिल्या आमदाराला शिक्षा होऊ शकल्याचे तिच्या वकिलांनी म्हटले आहे. पीडितेला प्रौढ सिद्ध करण्याचा प्रयत्न आरोपीकडून झाला होता. परंतु शाळेच्या प्रमाणपत्रातून बलात्काराच्या घटनेवेळी ती अल्पवयीन होती असे सिद्ध झाले होते.









