14 एप्रिलला जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी केली. सत्ताधारी आणि विरोधकांनी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेले फोटो सोशल मिडियावर शेअर केले. मात्र उध्दव ठाकरे यांनी बाबासाहेबांच्या फोटोला ना हार घातला, ना अभिवादन केलं असा आरोप भाजपने ट्विट करत केला आहे.उद्धव ठाकरेंना आंबेडकरी मतं हवी, पण आंबेडकर नको. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना औपचारिकता म्हणून बाबासाहेबांना अभिवादन केलं होतं? अश्या कोत्या वृत्तीचा निषेध, अस ट्विट भाजपानं केलं आहे. हे ट्विट करत असताना उध्दव ठाकरे यांना भाजपने टॅग केले आहे.
काय म्हटलयं ट्विटमध्ये
उद्धव ठाकरे यांच्या मनातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व आंबेडकरी समाजाबद्दल द्वेष काल पुन्हा एकदा दिसून आला.मुख्यमंत्री होण्यापूर्वी म्हणजे 2019 च्या आधी ठाकरेंनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी अभिवादन आणि महापरिनिर्वाण दिनी कधीही श्रद्धांजली वाहिली नाही.की काल,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साधं ट्विट केलं नाही, ना फोटोला पुष्पहार घातला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना औपचारिकता म्हणून बाबासाहेबांना अभिवादन केलं होतं? उद्धव ठाकरेंना आंबेडकरी मत पाहिजे, पण आंबेडकर नको, अश्या कोत्या वृत्तीचा निषेध करत टीका केली आहे.
Previous Articleएन्काउंटरपूर्वी असद अहमदचे पुणे आणि नाशिकमध्ये वास्तव्य
Next Article CRPF भरती परीक्षा आता मराठीतही








