वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेश भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री उमाशंकर गुप्ता यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना भोपाळ येथील जवाहर चौक येथील ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उमाशंकर गुप्ता यांना सोमवारी दुपारी दीड वाजता ऊग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. आता त्यांची प्रकृती धोक्मयाबाहेर आहे, असे अनंत हार्ट हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ञ डॉ. आर. एस. मीना यांनी सांगितले.
उमाशंकर हे भोपाळच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटाचे दावेदार होते. पक्षाच्या पाचव्या यादीत त्यांच्या जागी भगवानदास सबनानी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या पाचव्या यादीत तिकीट निश्चित झाल्यानंतर उमेदवार भगवानदास सबनानी हे उमाशंकर गुप्ता यांच्या घरी भेटीसाठी गेले होते. मात्र, गुप्ता यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे बैठक नाकारली होती.









