Sonali Phogat : भाजप नेता आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्या 42 वर्षांच्या होत्या. गोव्यातील एका हाॅटेलमध्ये त्या मृतावस्थेत पोलिसांना आढळल्या. त्यांचा मृतदेह गोव्यातील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आहे. सोनाली फोगट यांची ओळख टिक-टॉक स्टार अशीही होती. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
सोनाली यांनी हरियाणातील आदमपूर मतदारसंघातून भाजप नेते कुलदीप बिश्नोई यांच्या विरोधात मागील निवडणूक लढवली होती ज्यात त्यांचा पराभव झाला होता. येत्या निवडणूकीत त्या भाजपकडून तिकिट मिळवून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. गेल्या आठवड्यात कुलदीप बिश्नोई यांनीही त्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. हिसारमधून त्यांनी कुलदीप बिश्नोई यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








