नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची आज ईडी कार्यालयात चौकशी सुरु आहे. त्यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर देशभऱात काॅंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. दरम्यान भाजप नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. गांधी घराण्याची 2000 कोटींची संपत्ती वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काॅंग्रेसवर निशाणा साधताना त्य़ा म्हणाल्या, तपास यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी काँग्रेसशासित राज्यांतील वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. हे लोक उघडपणे एजन्सीवर दबाव आणत आहेत. हे काँग्रेस पक्षाचे धोरण आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, 2010 मध्ये, यंग इंडिया नावाची कंपनी 5 लाख रुपये घेऊन स्थापन झाली, ज्यामध्ये राहुल गांधी संचालक म्हणून सामील झाले. फक्त 75 टक्के हिस्सा त्यांचा होता, बाकीचा हिस्सा त्यांच्या आई सोनिया गांधींसह (Sonia Gandhi) इतर काही लोकांकडे होता. यानंतर एजेएलचे 9 कोटी शेअर्स यंग इंडियाला दिले आहेत. या कंपनीचे 99 टक्के शेअर्स यंग इंडियाला मिळाले असून 9 कोटींचा हिस्सा आहे. काँग्रेस पक्ष एजेएल कंपनीला 90 कोटींचे कर्ज देते आणि ते नंतर माफ करते हा कोणता प्रकार आहे असेही त्या म्हणाल्या. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा- राहुल गांधी ‘ईडी’ समोर हजर…
मुंबईत काँग्रेसचे कार्यकर्ते ताब्यात
देशभरात ईडी चौकशीदरम्यान राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या समर्थनार्थ आज मुंबईसह अनेक ठिकाणी काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ईडी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी 250 हून अधिक काँग्रेस कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









