वृत्तसंस्था/ पाटणा
तेलंगणातील शमशाबाद विमानतळावर पोलिसांनी भाजप नेते राजा सिंह यांना अटक केली आहे. हिंसाचारग्रस्त मेडक येथे जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. मेडक येथे शनिवारी रात्री पशू हत्येच्या घटनेवरून हिंसाचार झाला होता. खबरदारीचा उपाय म्हणून राजा सिंहला अटक केल्याचे शमशाबाद विमानतळ पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मेडकमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. शनिवारी रात्री येथे एका मदरशावर जमावाने हल्ला केल्याने अनेक लोक जखमी झाले आहेत. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने जातीय तणावावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले.









