आपले राजकीय जीवन महाभारतातील भीष्माचार्यांसारखे असून भीष्मासारखे दुःख सहन करण्यास आपण तयार असल्याचे मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त करून आपली नाराजी पुन्हा अप्रत्यक्षरित्या व्यक्त केली. तसेच आपल्या वडिलांना दिलेला शब्द आयुष्यभर पाळण्यास बांधिल असल्यचेही त्यांनी म्हटले आहे. त्या नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
या पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे यांना राज्याच्या राजकारणात योग्य संधी का दिली जात नाही यावर छेडले असता, त्या म्हणाल्या, “हा प्रश्न जनतेला आणि माझ्या कार्यतर्त्यांना विचारायचा आहे का? मी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. ज्यांनी मला संधी दिली नाही अशा लोकांना तुम्ही हे विचारा.”असे बोलून त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांवर निशाणा साधला.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या “ज्या लोकांसाठी मी राजकारणात आलो आहे त्यांच्याशी बांधिलकी ठेवण्याची मला परवानगी नसेल तर मला राजकारणात यायचे नाही. मला राजकारणात तडजोड मान्य नाही. जनतेच्या स्वाभिमानाशी तडजोड केल्यास आपण राजकारणातून बाहेर पडण्याचे पसंत करीन” असेही त्या म्हणाल्या.
Previous Articleकमी तेलकट आणि स्वादिष्ट ब्रेड समोसा
Next Article बांगलादेशात उडत्या विमानात मारामारी, व्हिडिओ व्हायरल








