मालवण / प्रतिनिधी
भाजप नेते दत्ता सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी रात्रीच धनुष्यबाण हाती घेतला. त्यांच्या समवेत असंख्य भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण हाती घेत निलेश राणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांच्या समोर केला.शनिवारी दत्ता सामंत यांनी भाजप नेते खासदार नारायण राणे यांचे भेट घेत आपण राणे कुटुंबीय यांच्यासोबत कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत दाखल होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा पक्षप्रवेश रविवारी सकाळी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, शनिवारी रात्रीच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धनुष्यबाण हाती घेतला. यावेळी निलेश राणे, रवी फाटक, बाळ चिंदरकर उपस्थित होते. प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये राजा गावकर, अनिल कांदळकर, जेराॅन फर्नांडिस, संतोष साटविलकर, मंदार लुडबे, सुनील घाडीगावकर यांच्या सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Previous Articleडॉक्टर दांपत्याची 55 लाखांची फसवणूक
Next Article भारतीय शेर सँटनरसमोर ढेर









