Chandrashekhar Bawankule: “शरद पवार विरोधात गेले की दौऱ्यावर निघतात. पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात”असा टोला राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला. काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बारामती दौऱ्यावर गेले होते. या विधानावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला आहे. शरद पवार याचं नाव आणि काम वापरून तुम्ही किती दिवस मोठे व्हाल? असा सवाल बावनकुळे यांनी केला आहे.
बावनकुळे म्हणाले की, तो काळ आता गेला आहे. शरद पवार याचं नाव आणि काम वापरून तुम्ही किती दिवस मोठे व्हाल? स्वत:चं कर्तृत्वही दाखवावं लागेल. शरद पवारांनी त्यांच्या आयुष्यात काम केलं आहे. पण त्यांच्या कामावर दुसरे तरून जातील असा काळ आता गेला आहे. जो पदावर आहे, तो किती काम करतो हे आता पाहिलं जातं. आता जनता तर बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर अशा विचाराची आहे”, असंही बावनकुळे म्हणाले आहेत.
Previous Articleपुढील वर्षापासून कारमध्ये किमान 6 एअरबॅग अनिवार्य- नितीन गडकरी
Next Article कॅम्प येथील खूनात यांचा समावेश ..!








