कंत्राटी भरतीचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला होता असा आरोप ठेऊन शिंदे- फडणवीस सरकारने रद्द केल्यानंतर आज कोल्हापूरात भाजपतर्फे महाविकास आघाडीचा निषेध करून जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी यांनी महाविकास आघाडीविरूध्य घोषणा देऊन कंत्राटी भरतीला महाविकास आघाडीचं जबाबदार असल्याचा आरोप केला.
पहा VIDEO>>> कंत्राटीभरतीचा निर्णय घेतलेल्या महाविकास आघाडी विरोधात भाजपच जोडे मारो आंदोलन
कंत्राटी भरतीच्या निर्णयाला राज्यभरातून विरोध होऊ लागल्यावर शिंदे- फडणवीस सरकारने हा निर्णय मागे घेतला. या निर्णयाची घोषणा करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडी सरकारचे पाप आमच्या माथी नको असेही वक्तव्य केले. महविकास आघाडी काळात कंत्राटी भरती चा घाट घालण्यात आल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आज भाजपच्या वतीने राज्यभरात महाविकास आघाडी विरोधात आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील बिंदू चौकात खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वात भाजप कोल्हापूरच्या वतीने महाविकास आघाडीचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी बोलताना त्यांनी हा निर्णय घेऊन महाविकास आघाडी सरकारने राज्यातील युवकांची फसवणूक केली असल्याचे म्हटले आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत महाविकास आघाडीचा प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे देखील मारण्यात आले. खासदार महाडिक यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली.









