पुलाची शिरोली, वार्ताहर
Kolhapur News : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गच्या ठिकाणी शिरोली सांगली फाटा ते तावडे हॉटेलपर्यंत पिलर पुल किंवा उड्डाणपूल तयार करणे हा एकमेव मार्ग आहे.सहा पदरी नंतर महामार्गाची उंची परत वाढल्यास पुराचीस्थिती आणखीनच धोकादायक होण्याचा संभव आहे. त्यामुळे महामार्गाचा भरावा काढून या ठिकाणी पिलर पूल बांधावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत आपण केंद्रीय दळण वळण मंत्री नितीन गडकरी व राज्याचे बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्याबरोबर बैठक घेवून या महामार्गाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन गणेश भेंगडे यांनी दिले.भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्राचे नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश तात्या भेंगडे यांनी शिरोली येथे पूरस्थितीची पाहणी केली.यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी मागण्यांचे निवेदन दिले.यावेळी माजी उपसरपंच कृष्णात करपे यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा राहिलेला पन्नास हजार रुपयांचा हप्ता त्वरित देण्याची मागणी केली.जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी शिरोली गावातील पूरस्थितीचा पाढाच वाचून दाखवला. यावेळी बोलताना सतीश पाटील म्हणाले की, शिरोली गावावरून जाणारा महामार्ग हा वरदान न ठरता पूरस्थितीमध्ये सध्या शाप ठरत आहे. या महामार्गामुळे गावाच्या पश्चिमेकडील भागात पूरस्थिती निर्माण होते.जसजशी महामार्गाची उंची वाढवत नेली, तस तशी पूरस्थिती गंभीर होत गेली आहे. या महामार्गामुळे शिरोली नदी सोडली तर कुठेही पाण्याचा विसर्ग होण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही.त्यामुळे पुराचे पाणी महामार्गाच्या पश्चिमेकडील बाजूस साठून या ठिकाणी तलाव्याचे स्वरूप निर्माण होते. त्यामुळे महामार्गाच्या पश्चिमेकडील सर्व गाव व शेती पुराच्या पाण्यामुळे बाधित होते. तसेच पश्चिमेकडे शिरोलीसह प्रयाग चिखली,वरणगे पाडळी,आंबेवाडी शिये,भुये आदी गावांना या महापुराचा तडाका बसून येथील ऊसशेतीचे अतोनात नुकसान होते. कोल्हापूर शहरालाही या पुराचा कायमपणे फटका बसत असल्याचे त्यांनी गणेश भेंगडे यांना सामगितले.
यावेळी उदयसिंह पाटील,अनिल शिरोळे,निशीकांत पद्माई, दिलीप शिरोळे,योगेश खवरे,दिपक यादव,राजेंद्र खटाळे,मारुती मिसाळ,बाळासाहेब पाटील, अमोल सोडगे, अरुण सोडगे, विनायक मोगले, सतीश सोडगे ,आदी मान्यवर उपस्थित होते.









