कर्नाटक काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांनी भाजपला (BJP) खोटेपणाचे विद्यापीठ म्हटले असून भाजपने काँग्रेसच्या भीतीने महादेयी नदीचा प्रकल्प अहवाल (DOR) पास केल्याचा दावा केला. कर्नाटक आणि गोवा राज्यांतून वाहणाऱ्या महादयी नदीच्या पाणी वाटपावरून गेल्या तीन दशकांपासून संघर्ष सुरू असून कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिक तीव्र झाला आहे.
111 किमी लांब गेलेली महादयी नदी कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातून पश्चिम घाटात पोहोचते. गोव्यात प्रवेश करण्यापुर्वी ती पश्चिमेकडे वाहते. गोव्यातून वाहणार्या दोन प्रमुख नद्यांपैकी महादयी ही असून ती अनेक प्रवाहांनी जोडली जाते. महादयी शेवटी पणजी येथे अरबी समुद्रात वाहते.
महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोव्यात सत्तेत राहूनही भाजप हा वाद मिटवू शकला नसल्याने भाजप हे खोटेपणाचे विद्यापीठ असल्याचे कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डिके शिवकुमार म्हणाले. “भाजप बाकीचे काम का सुरू करू शकत नाहीत? तुमचं राज्य..तुमचा पैसा…तुम्हाला काम करण्यापासून कोणी रोखतंय?” असेही ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









