मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
मडगाव / प्रतिनिधी
‘विकसित भारत 2047’ व ‘विकसित गोवा 2037’ हे केवळ भाजप सरकारच कऊ शकते. भाजप सरकार पुन्हा सत्तेत आणण्यासाठी दामू नाईक यांना कार्यकर्त्यांसह लोकांनी सहकार्य मिळावे. लोकांच्या सहकार्यावर 2027 मध्ये पुन्हा एकदा भाजपचे डबल इंजिन सरकार सत्तेत येईल व तेच दामू नाईक यांना गिफ्ट असेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या वाढदिवसाच्या फातोर्डा येथील कार्यक्रमाला मंत्री सुभाष शिरोडकर, मंत्री दिगंबर कामत, नरेंद्र सावईकर, आमदार दाजी साळकर, सर्वानंद भगत, क्लिओफात डायस यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप नेहमीच आत्मनिर्भर भारत व स्वयंपूर्ण गोवा या पंतप्रधान मोदींच्या व्हिजननुसार अंत्योदय, सर्वोदय व ग्रामोदय या तत्वावर काम करत आहे. त्यामुळे भाजपचे सरकार आज सत्तेवर आहे. गोव्याचा विकास हा खऱ्या अर्थाने 2014 मध्ये भाजप सत्तेत आल्यापासून झालेला आहे. डबल इंजिनचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत आणण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतील, असे सांगितले. राज्यात व देशातून आता भाजपचे राज्य कायम राहील व नव्या पर्वाची ही सुऊवात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम सतत करत राहावे, असे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.
राज्यात 2027 मध्ये 51 टक्के मते घेत भाजप सरकार यावे यासाठी दामू नाईक यांनी संकल्प केलेला आहे. त्यांच्या वाढदिनानिमित्ताने लोकांचा मिळालेला पाठिंबा पाहता हा संकल्प पूर्ण होईल, असे मंत्री कामत यांनी सांगितले.
राज्यात 51 टक्के मते मिळवण्याचा संकल्प : दामू नाईक
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले की, राज्यात भाजपची सत्ता चौथ्यावेळी आणण्यासाठी बळ द्यावे, असे मागणे आपण गणरायाकडे केलेले आहे. आत्मनिर्भर भारत व स्वयंपूर्ण गोवा करण्यासाठी 27 मध्ये 27 जागा आणण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे. राज्यात 51 टक्के मते भाजपला मिळावीत यासाठी प्रयत्न कऊया. ऊसवे फुगवे सोडून लोकसभेत ज्याप्रमाणे काम केले त्याप्रमाणे विधानसभेतही केवळ भाजप पक्षासाठी काम कऊन विजय मिळवूया, असे सांगितले.









