मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : ग्रामीण विकस यंत्रणेच्या ‘अनुभूती’चे उद्घाटन
पणजी : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या हृद्य हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गी लावलेल्या अनेक योजनांमुळे देशासह गोव्यातील महिलांचाही सहभाग वाढून त्यांचा विकास झाला आहे. गत 11 वर्षांतील भाजप सरकारच्या सफलतेचे हेही एक गमक आहे. या योजनांमुळे महिलांना सन्मानाचे जीवन जगणे शक्य होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे मंगळवारी पणजीत आयोजित ‘अनुभूती’ या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय संयुक्त सचिव श्रुती शरण, सहसचिव डॉ. मोनिका तसेच राज्य सचिव संजय गोयल आदींची उपस्थिती होती.
गोवा देशात आघाडीवर
केंद्र आणि राज्यातही भाजपचीच सत्ता असल्यामुळे या डबल इंजिन सरकारने गत 11 वर्षामध्ये केवळ पायाभूत सुविधाच नव्हे तर मनुष्यबळ विकासही केला आहे. त्यातूनच राज्य सरकारने केंद्र पुरस्कृत अनेक प्रकल्पांची कामे 100 टक्के पूर्ण केली आहेत. याकामी गोवा देशात आघाडीवर आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पर्यावरणपूरक विकास
स्वच्छतेच्या बाबतीत देशात आघाडीवर असून ग्रामीण विकास यंत्रणेच्या आदर्शवत कामामुळे हल्लीच राज्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे, असे सांगून याकामी योगदान देणाऱ्या पंचायतराज संस्था, जिल्हा पंचायती आणि अन्य स्वराज संस्थांच्या कार्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. सरकारने ग्रामीण भागात स्वच्छतेबरोबरच पायाभूत सुविधा आणि पर्यावरणपूरक हरित उपक्रम विकसित करण्यावरही विशेष लक्ष केंद्रित केले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सन, सँड, सी, स्पिरिच्युअलिटी
आतापर्यंत गोव्याची ओळख ही केवळ ‘सन, सँड आणि सी’ या तीन ‘एस’ पुरतीच मर्यादित होती. त्यात आता आध्यात्म अर्थात ‘स्पिरिच्युअलिटी’ ऊपी आणखी एका ‘एस’ ची भर पडली आहे. त्यामुळे गोवा हे आध्यात्मिक पर्यटनाचे केंद्र म्हणूनही उदयास येत आहे. या उपक्रमाला चालना देण्यासाठी खास धोरण तयार करण्यात आले असून ग्रामीण सांस्कृतिक वारसा दर्शविणारी प्राचीन मंदिरे, घरे, योग केंद्रे, आयुर्वेद-आधारित रिसॉर्ट्स आदींचा त्यात समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ‘अनुभूती’ हा उपक्रम राज्याचा आध्यात्मिक वारसा, नैतिक मूल्ये आणि पारंपारिक संस्कृती अधोरेखित करतो. त्याद्वारे तऊण पिढीला भारताच्या प्राचीन परंपरांशी जोडणे हा त्याचा उद्देश आहे. या उपक्रमांद्वारे विद्यार्थी, तऊण, स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांना गोव्याच्या खऱ्या सौंदर्याची ओळख करून देण्यात येत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.









