मच्छिमारमंत्री निळकंठ हळर्णकर यांचा विश्वास, दोन समर्थकांची बिनविरोध निवड
प्रतिनिधी /पणजी
बार्देश तालुक्यातील नादोडा पंचायत निवडणुकीत मच्छिमारमंत्री निळकंठ हळर्णकर समर्थक दोन पंचसदस्य बिनविरोध निवडून आले असून उर्वरीत प्रभाग 1 व 2 मध्ये होणाऱया निवडणुकीत दोन्ही पंचसदस्य आपल्याच पॅनलमधून निवडून येतील आणि नादोडा पंचयतीवर भाजपचा झेंडा फ्ढडकेल, असा विश्वास मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी व्यक्त केला.
नादोडा पंचायतीच्या प्रभाग 3 मधून परेश दयानंद गावस तर प्रभाग 5 मधून रामा नारायण नादोडकर यांची पंचसदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल मंत्री हळर्णकर यांनी दोन्ही पंचसदस्यांचे पुष्पगुच्छ देउढन अभिनंदन केले तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पंचायतीच्या सहकार्याने नादोडा गावात मोठय़ा प्रमाणात विकासकामे करण्यास मदत होईल, असे मंत्री हळर्णकर यांनी सांगितले.
ग्रामस्थांनी आपल्यावर विश्वास ठेवून बिनविरोध निवडून दिल्याबद्दल निवडून आलेल्या दोन्ही पंचसदस्यांनी आपल्या प्रभागातील ग्रामस्थांचे आभार मानले. मंत्री हळर्णकर यांच्या सहकार्याने नादोडा गावात क्रीडा मैदान, अत्याधुनिक व्यायामशाळा तसेच ग्रामस्थांच्या मागणीनुसार इतर विकासकामे मार्गी लावणार असल्याचे दोन्ही पंचसदस्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक भाजप कार्यकर्ते योगानंद गावस, येतू गावस, संजू गावस, विशांत गावस, ताराचंद्र गावस, प्रणेश गावस, उत्कर्ष गावस व इतर उपस्थित होते.









