अशोक धाऊस्कर सरपंच, उपसरपंच कृष्णा हरीजन
प्रतिनिधी /पणजी
इब्रामपूर-हणखणे पंचायतवर भाजपाचा झेंडा लागला असून, अशोक महादेव धाऊस्कर हे सरपंच तर उपसरपंचपदी कृष्णा गोविंद हरजीन यांची निवड झाली आहे. सरपंच उपसरपंच पदाची बिनविरोध निवडणूक झाली असून निर्वाचन अधिकारी म्हणून प्रशांत राऊत यांनी काम पाहिले. दरम्यान पेडण्याचे आमदार प्रविण आर्लेकर यांनी पंचायतीत भेट देऊन सरपंच व उपसरपंच यांचे अभिनंदन केले.
निवनिर्वाचीत सरपंच अशोक धोऊस्कर हे तीन वेळा पंच सदस्य म्हणून निवडून आले आहेत तर कृष्णा हरीजन हे पहिल्यांदाज निवडून आले आहेत. आपली सरपंचपदी झालेली निवड याचे श्रेय आपल्या कार्यकर्त्यांतना जात असून हा विजय त्यांचाच असल्याचे सरपंच अशोक धाऊस्कर यांनी सांगितले.
पुढे बोलताना अशोक धाऊस्कर म्हणाले की इब्रामपूर गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई होत असून त्याबाबत गांभीर्याने लक्ष दिले जाईल. इब्रामपूर गावात नदी भली मोठी नदी असून गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी नाहक त्रास सोसावे लागतात. खाकेत कळसा आणि गावाला वळसा अशी स्थिती होत असल्याने इब्रामपूर गावासाठी स्वतंत्र पंपहाऊस उभारून इब्रामपूर गावात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीन.
इब्रामपूर गावातील हरीजन वाडय़ावरील जमीनीचा प्रश्न वादग्रस्त बनलेला असून त्या लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ही समस्या मोठी गंभीर असून त्वरीत सोडविण्यासाठी आपण जातीने लक्ष घालणार आहे. घर मालकाचे मात्र ज्या जमीनीवर घर आहे ती जमीन भलत्याचीच अशी त्यांची स्थिती झाले असल्याने त्यांना प्रत्येक कामात अडचणी येत असतात. या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही अशोक धाऊस्कर यांनी सांगितले.









