Sharad Pawar Sanjay Raut देशातील सर्वात भ्रष्ट पक्ष म्हणून इतिहासात भारतीय जनता पक्षाची नोंद होईल. तसेच गुलामांना कोणताच स्वाभिमान नसतो. राज्यात भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचे आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राउत यांनी म्हटले आहे. अजित पवार यांनी शिंदे- भाजपबरोबर जाण्यासाठी ऱाष्ट्रवादीशी बंड केल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शरद पवार एकटे नसून आम्ही त्यांच्या बरोबर असून महाविकास आघाडी एकत्र असल्याचेही ते म्हणाले.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “भाजपने जे काही केलय त्याला लोकांचा पाठिंबा नाही. देशातील भ्रष्ट पक्ष म्हणून भाजपची ईतिहासात नोंद होईल. फोडाफोडीचे राजकारण करून खुप शौर्यपणा वाटत असेल तर 2024 ला आमचीसुद्धा सत्ता येईल. त्यावेळी मास्टरस्ट्रोक काय असतो हे आम्ही दाखवून देणार. बंडखोर हे गुलाम आहेत गुलामांना स्वाभिमान नसतो.”असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “राज्यात भाजप कडून फोडाफोडीचे राजकारण आहे. कितीही आमदार खासदार फोडले तरी जनता आमच्या सोबतच आहे. तसेच आम्ही आमच्या जागेवर मजबूत आहोत. भाजपला वटते की त्यांनी जे केलं ते बरोबर केले. त्यांनी आता विधानसभेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणूका घ्याव्यात.”
“राष्ट्रवादीबाबत जे घडलय त्याबाबत आम्ही सर्व एकत्र आहोत. आम्हीही त्या प्रसंगातून गेलो आहोत. आम्ही शरद पवार आणि त्यांच्या सहकार्यांच्या पाठीमागे उभे आहोत. शिंदे गट निष्क्रिय नाही. त्यांचे पायपुसणे झाले आहे. ते गुलाम झाले असून गुलामांना स्वाभिमान नसतो.”
समान नागरी कायद्यावर भाष्य करताना ते म्हणाले, “समान नागरी कायद्याची चर्चा भाजपने सुरु केली आहे. काश्मिरमद्ये 370 हटवल्य़ानंतरही 4 वर्षे झाली तरीही निवडणूका झाल्या नाहीत. देशात सर्वांसाठी सारखा कायदा असावा. तरीही त्या कायद्याता मसूदा कसा असावा यावर आमची भुमिका ठरवू” असे ते म्हणाले.