खानापूर : खानापूर तालुक्यात भाजपची उमेदवारी विठ्ठल हलगेकर यांना जाहीर झाल्यानंतर खानापूर भाजपच्या प्रभारी उज्ज्वला बडवाण्णाचे यांनी बैठक घेऊन निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका भाजपचे अध्यक्ष संजय कुबल होते. येथील भाजप पक्ष कार्यालयात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत प्रचाराची रणनिती तसेच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभारी उज्ज्वला बडवाण्णाचे यांनी सर्व कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या प्रचारयंत्रणेबाबत तसेच बुथ पातळीवर जबाबदारी देण्यात आलेल्या कार्यकर्त्यांनी योग्यपद्धतीने आपापली जबाबदारी पार पडल्यास भाजपचा विजय निश्चित आहे. यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे कार्य सुरू करावे, असे आवाहन केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर, किरण यळळूरकर, सुरेश देसाई, वासंती बडिगेर यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Articleनासीर बागवान यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार
Next Article घटप्रभा नदीपात्रात चार तरुण बुडाले
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.