येत्या काळात महाविकास आघाडीला (MVA) अनेक धक्के बसणार असून अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याचे धक्कादायक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे (Chandrashekhar Bavannkule) यांनी केले.
आज माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “येत्या काळात महाविकास आघाडीतील घटक पक्षांना अनेक धक्के बसणार आहेत. कॉंग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते भाजपच्या संपर्कात असून ते लवकराच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तसेच ऱाष्ट्रवादीच्या गोटातून अनेक नेते भाजपच्या मागावर आहेत. ठाकरे गटातील उरलीसुरली नेते मंडळीही एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अगदी बूथ पातळीवरून अगदी आमदार आणि खासदार या पातळीची नेते मंडळी भाजपमध्ये येणार असून महाविकास आघाडीला येत्या काळात विधानसभा आणि लोकसभेसाठी उमेदवार मिळणेही कठिण होणार आहे.” असे मत त्यांनी व्यक्त केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








