पोलिसांची मध्यस्थाची भूमिका; दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी
बेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून गुरुवारी बेळगावमध्ये भाजप व काँग्रेस आमनेसामने आले. काँग्रेसकडून अमित शहा यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे, असा आरोप भाजपने केला. तर अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचे प्रत्युत्तर काँग्रेसने दिले आहे. यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. पोलिसांनी मध्यस्थाची भूमिका घेत कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला.
गृहमंत्री अमित शहा यांचे वक्तव्य हे काँग्रेस पक्षाला उद्देशून होते. परंतु, काँग्रेसचे पदाधिकारी मात्र त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करीत आहेत. तसेच सोशल मीडियावर भाषणातील काही भाग व्हायरल करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करत भाजपने सोन्या मारुती चौकातील काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन केले. काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
भाजप कार्यकत्यर्नां प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्तेही घोषणा देऊ लागले. अमित शहा यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागावी, तसेच भाजपने सुरुवातीपासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दुय्यम स्थान दिले असून हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिल्याचे अनेक उदाहरणातून स्पष्ट झाले आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने अखेर पोलिसांनी भाजप कार्यकत्यर्नां ताब्यात घेऊन पोलीस वाहनातून इतरत्र नेऊन सोडले. या सर्व प्रकारामुळे सोन्या मारुती चौकातील वाहतूक काहीकाळ थांबवावी लागली.









