हिंडलगा/वार्ताहर
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार नागेश मनोळकर हे सोमवार दि. 17 रोजी दुपारी 1 वाजता आपला उमेदवारी अर्ज निवडणूक विभागाकडे भरणार आहेत. तरी ग्रामीण भागातील सर्व भाजप कार्यकर्ते व हितचिंतकांनी चन्नम्मा चौकातील सरदार हायस्कूल मैदानावर वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









