चंदीगड
हरियाणाच्या कुरुक्षेत्र येथील पिहोवा मतदारसंघातील भाजप उमेदवार कवलजीत सिंह अजराना यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. भाजपने त्यांना माजी मंत्री संदीप सिंह यांच्या जागी उमेदवारी दिली होती. अजराना यांना निवडणूक प्रचारादरम्यान मोठा विरोध झाला होता. पक्षातही स्थानिक स्तरावर त्यांना विरोध सुरू झाला होता. पिहोना मतदारसंघात 2019 मध्ये हॉकी संघाच माजी कर्णधार संदीप सिंहने भाजपच्या तिकिटावर विजय मिळविला होता. तसेच त्यांना राज्य सरकारमध्ये क्रीडामंत्री करण्यात आले होते. परंतु काही काळापूर्वी संदीप सिंह हे लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आले आहेत.









