ऑनलाईन टीम/ तरुण भारत
मुंबई: वीस तारखेला होणाऱ्या विधानपरिषदेसाठी भाजपाने पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड ही पाच नावे जाहीर करण्यात आली. मात्र विधानपरिषदेसाठी पंकजा मुंडेंचा पत्ता कट करुन उमा खापरे यांना संधी दिली आहे. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. दरम्यान नावे जाहीर होताच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी खूप प्रयत्न केले आहेत. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. केंद्राने भविष्याचा विचार केला असावा असे चंद्रकांत पाटील म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, घटक पक्षातील नेत्यांनाही भाजपाकडून संधी मिळाली नाही. या निवडणूकीत आमच शक्तीप्रदर्शन नसून प्रशिक्षण आहे अस म्हणत आघाडील टोला लगावला.
अधिक वाचा : विधानपरिषदेसाठी भाजपची यादी जाहीर; जाणून घ्या कोण आहेत उमेदवार
गेल्या काही दिवसापासून राज्यसभा तसेच विधान परिषदेसाठीही पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळणार अशा चर्चा सुरू होत्या. मात्र राज्यसभेतही पंकजांना उमेदवारी डावलण्यात आली. राज्यसभेसाठी भाजपाने पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. विधान परिषदेवर पाठवायचं की नाही हा निर्णय पक्ष घेईल, अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली होती. तसेच ज्यांना उमेदवारी मिळाली, त्यांना शुभेच्छा अशी प्रतिक्रियाही दिली होती.
चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले, भाजपच्या बैठकित अपक्षांना निमंत्रण दिले नव्हते. तर आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यसभा निवडणूकीसाठी मनसेकडील एक मत भाजपला मिळावं या अनुषंगाने ही भेट महत्वाची असल्याचेही ते म्हणाले.