केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी आज कोल्हापूर दौरा करून 2024 निवडणुक शिवसेना आणि भाजप एकत्र लढवणार असल्याचे जाहीर केले. तसेच 2024 ला देखिल भाजपचाच विजय होईल असे सांगून येणारी निवडणुक ही नविन भारताच्या निर्मितीसाठी लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी आज पुण्यानंतर कोल्हापूरचा दौरा केला. भाजप कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी 2024च्या निवडणुकीवर भाष्य केले. त्यांनी कॉंग्रेसवर टिका करून सगळ्यात भ्रष्ट सरकार असल्याचे सांगितले. यावेळी ते म्हणाले
“2014 पुर्वी सर्व मंत्री स्वताला पंतप्रधान मानत होते.तर स्वता पंतप्रधानांना कोणी विचारत नव्हते. कॉंग्रेसच्या काळात अराजकता होती. 12 लाख कोटींचा भ्रष्टाचार कॉंग्रेसच्या काळात झाला.” असेही ते म्हणाले.
येणारी निवडणुक ही नविन भारत घडवण्यासाठी लढायची आहे. ही निवडणुक भाजप आणि शिवसेना एकत्रित लढणार आहोत तर आमच्या विरूध्द बाकीचे सर्व लढणार आहेत.” असे मत अमित शहांनी व्यक्त केले.
Previous Articleनौदलाला मिळणार स्वदेशी बॉट्स
Next Article मध्यप्रदेश, अरुणाचलमध्ये भूकंपाचा धक्का









