Devendra Fadnavis : कोणतेही गैरसमज होऊ नये म्हणून काल शिवसेनेचे खासदार आमच्या मंचावर होते. कृपया गैरसमज करू नका. अमित शहा यांनी एनडीएतून खासदार निवडून येतील हे स्पष्ट केले आहे.त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला आहे. योग्यवेळ आली की आम्ही जाहीर करू अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज कोल्हापुरात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
अमित शहा शत्रू नंबर एक आहेत असं काल उध्दव ठाकरे म्हणाले होते, असा प्रश्न फडणवीसांना विचारताच ते म्हणाले की, आम्ही कोणाला शत्रू मानलं नाही. आम्ही वैचारीक विरोधक मानतो. उद्धव ठाकरे अमित शहाना शत्रू मानत असतील पण आम्ही कोणाला शत्रू मानत नाही असेही त्यांनी स्पष्ट केलं.
Previous Articleप्रशासनातर्फे शिवजयंती साजरी
Next Article विचारांमध्ये आधुनिकता आणावी लागेल








