दिलेले आश्वासने पूर्ण करण्यास अयशस्वी होऊन राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत असलेला गंभीर आरोप राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केला.
ते आज बेळगाव शहरातील कन्नड साहित्य भवन येथे बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेसने पूर्व नियोजन नसताना गॅरंटी योजना देण्याचे आश्वासन दिले. केंद्रीय आहार निगमच्या वतीने गरीब कुटुंबातील सदस्याला आणि एपीएल कार्डधारकांना प्रत्येकी ५ किलो तांदूळ देण्यात येत होते. सुमारे ८० कोटी जनता या योजनेचा लाभ घेतला आहे.आता काँग्रेस सरकार केंद्रीय आहार निगमच्यावतीने अन्नभाग्य योजनेसाठी तांदूळ दिले जात नाही असे खोटे बोलून जनतेची दिशाभूल करीत आहे. या विषयावर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलनाला उतरणाऱ्या राज्य सरकारच्या धोरणाचा त्यांनी तीव्र निषेध केला.याचवेळी पहिले २०० युनिट वीज मोफत देण्याचे सांगून त्याला आता अटी लागू करण्यात येत असल्याचा आरोप केला. केईआरसीच्या वतीने होत असलेल्या वीजबिल दरवाढीवर नियंत्रण मिळविण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे असा टोला लगावला.
याच वेळी बेळगाव ग्रामीण भाजप जिलाध्यक्ष संजय पाटील यांनी देखील काँग्रेस सरकारवर निशाणा साधला.
यावेळी भाजप शहर महासचिव मुरूघेन्द्रगौडा पाटील, दादागौडा बिरादार व इतर उपस्थित होते.









