Bitter Melon Recipe : कारल म्हटलं की प्रत्येकाला नकोस होतं. आईने एखादे वेळेस डब्यात कारलं दिलचं तर तोंड वाकड करत खावं लागतचं. कारलं मला खूप आवडतं म्हणणाऱ्यांची संख्या हातावरच्या बोटावर मोजण्या इतकीच. पण कारली खाण्याचे अनेक फायदे आहेत. कारल्यात फायबर्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कारले खाण्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. कारले खाल्याने वाईट कोलेस्टेरॉल कमी होते. तसेच कारल्याच्या भाजीत अ, ब, क जीवनसत्व असतात. त्यासोबतच केरोटीन, बीटाकेरोटीन, लूटीन, लोह, झिंक,पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅग्नीजसारखे आरोग्यास उपयुक्त घटक असतात. त्यामुळेच कारल्याची भाजी आठवड्यातून एक ते दोन वेळा खायलाच हवी असं आहार तज्ज्ञ सांगतात. म्हणूनच अनेक गृहिनी कारल्याची भाजी, कारले फ्राय, लोणचे असे पदार्थ बनवून खायला वाढतात. पण अशा पध्दतीने देखील तुम्हाला कारले आवडत नसेल तर तुमच्यासाठी आम्ही खास कारल्याची कोशिंबीर ही रेसीपी घेऊन आलो आहोत. ज्याची चव तुम्हाला नक्कीच आवडेल याची आम्हाला खात्री आहे. ही रेसीपी खास तरूण भारतच्या वाचकांसाठी दिलीय कागलच्य़ा तरूण भारतच्य़ा वाचक गायत्री देशपांडे यांनी. चला तर कारल्याची कोशिंबीर कशी तयार करायची हे जाणून घेऊया या रेसीपी चला तर मग.
साहित्य
कारली – 2
नारळ – 1 (खणून घेणे)
कांदे – 4
कोथिंबीर – छोटी वाटी चिरून घेणे
लिंबू – अर्धा
मीठ – छोटा चमचा
साखर – 1 चमचा
मिरची – 3
कृती
सुरुवातीला कारले स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर बी काढून कारले खिसून घ्या. आता मीठ लावून कारल्याचा खिस पिळून घ्या. त्यामुळे कारल्यातील कडूपणा निघून जाण्यास मदत होते. या प्रकियेनंतर गॅसवर कढई किंवा तवा ठेवून किसलेले कारले थोडे तेल टाकून फ्राय करून घ्या. कारले 5 मिनिट हलवत राहिल्यानंतर त्यात मिरचीचे तुकडे घाला. गॅस बंद करून हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्या. कांदा बारीक चिरून मिक्स करा. त्यामध्ये मीठ,साखर,कोथिंबीर,लिंबू,नारळाचा किस मिक्स करून घ्या. तयार झाली कारली कोशिंबीर. तुम्ही ही कोशिंबीर जेवताना ताटाला थोडी-थोडी वाढवा.