कोल्हापूर
पन्हाळा तालुक्यातील मल्हारपेठ येथील बाजारपेठेत गव्याने फेरफटका मारल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. मल्हारपेठच्या गावकऱ्यांना सकाळच्या दरम्यान गव्याचे दर्शन झाले. गव्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर वन विभागाची टीम घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यानंतर वन विभागाने त्या गव्याला डोंगराळ भागात सुखरुप सोडले.








