Satara Bison News : महाबळेश्वर पासून सहा किलोमीटर अंतरावर मेढा रस्त्यावर गुरुवारी एक टन वजनाचा महाकाय रानगाव जखमी अवस्थेत बसलेला आढळून आला. स्थानिक नागरिकांनी प्राणिमित्र यांच्या सहकार्याने जखमी गव्याची माहिती वन विभागाला दिल्यानंतर त्या ठिकाणी वन विभागाची टीम दाखल झाली.वन विभागाने पुणे येथील रेस्क्यू टीमला घटनास्थळी पाचारण केले. या टीमने जागेवर प्राथमिक उपचार केल्यानंतर या गव्यास पुढील उपचारासाठी चांदोली अभयारण्य नेण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली.
Previous ArticleSangli : मंत्र सामर्थ्याच्या दाव्याला अंनिसचे आव्हान
Next Article दलित तरुणांनी उद्योग व्यवसायासाठी पुढे यावे









