Birthday wishes to Ravindra Chavan on behalf of Dodamarg BJP
राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा अन्न पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवशी दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी त्यांची मुंबईत भेट घेऊन पुष्पगुच्छ देत अभिष्टचिंतन केले. शहरातील सर्व नागरिक, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते या सर्वांच्यावतीने चेतन चव्हाण यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान दोडामार्ग शहराच्या विकासासाठी भरीव निधी तसेच आवश्यक ते सर्व सहकार्य देणार असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी बोलताना स्पष्ट केले.
नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्यासोबत भाकपचे माजी दोडामार्ग शहराध्यक्ष समीर रेडकर, पं. स. माजी सदस्य बाळा नाईक, खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर हे होते. यावेळी रवींद्र चव्हाण यांच्याशी चेतन चव्हाण यांनी कसई – दोडामार्ग नगरपंचायत संदर्भात सविस्तर चर्चा केली. शहराचा वाढत विस्तार, वाढती लोकसंख्या उद्योगधंदे – व्यवसाय लक्षात घेता शहराच्या विकासासाठी भरीव निधिकडे चेतन चव्हाण यांनी मंत्री श्री. चव्हाण यांचे लक्ष वेधले. शहरासाठीची नियोजित नवीन नळ योजना, शहरातील अंतर्गत रस्ते, शिवाय अन्य मूलभूत सोयीसुविधा उभ्या करण्यावर नगरपंचायतची कार्यवाही सुरू आहे असे श्री. चव्हाण यांनी स्पष्ट करताच दोडामार्गच्या विकासासाठी भरीव निधी नागरपंचायतला उपलब्ध करून दिला जाईल तसेच प्रशासकीय पातळीवरून आवश्यक असणारी सर्व प्रकारची मदत देखील उपलब्ध केली जाईल अशी ग्वाही मंत्री चव्हाण यांनी दिली. दरम्यान दोडामार्ग शहर भेट करण्याचे निमंत्रण देखील चेतन चव्हाण यांनी मंत्री चव्हाण यांना दिले.
दोडामार्ग – वार्ताहर









