मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची उपस्थिती
सांखळी : लोक सेवा, सामाजिक कार्य आणि एकनिष्ठ प्रामाणिकपणा अंगी असल्यास जीवनात आपण खूप पुढे जाऊ शकतो. गावातील ज्येष्ट नागरिकांसोबत वाढदिवस साजरा करणे खरच अभिनंदनीय आहे. असच प्रेम आमच्यावर राहू दे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली. सांखळी भाजप मंडळ अध्यक्ष व जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सुलक्षणा सावंत आणि पार्थवी प्रमोद सावंत यांचींही उपस्थिती होती. ग्रामपंचायत कार्यालयातील उम्मीद केंद्रात झालेल्या या कार्यक्रमास उपसरपंच भोला खोडगीणकर, पंच सुभाष फोंडकर, मनोहर वळवईकर, जागा गावकर, बाबलो नाटेकर, तुळशीदास फोंडकर, नीलेश नाईक, मंगलदास उसगावकर यांच्यासह गावातील ज्येष्ट नागरिकांची उपस्थिती होती.
उम्मीद केंद्राच्या प्रत्येक सदस्याचा वाढदिवस साजरा करणार : सुर्लकर
सांखळी मतदारसंघातील नागरिकांनी मला भरभरून प्रेम दिले आहे. त्यामूळेच मी इथपर्यंत पोचलो आहे. या पुढे ही मला आपल्या आशीर्वादांची आवश्यकता आहे. आज पूर्ण दिवस जरी व्यस्त असलो तरी सुर्ला उम्मीद केंद्रातील प्रत्येक सदस्याचा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याचे जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर यांनी आपल्या वाढदिवस कार्यक्रमात बोलताना सांगितले. यावेळी अंकुश फोंडेकर, मोहन फोंडकर, महादेव आमोणकर, रमेश सतोडकर, जानू सतोडकर, रोहिदास नार्वेकर, विठ्ठल उसगावकर, रत्ने उसगावकर, सीता वळवईकर व अन्य ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती.
सांखळी मतदारसंघातून गोपाळ सुर्लकर यांना शुभेच्छा
सांखळी मतदारसंघातील सांखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष रश्मी देसाई, पाळी सरपंच शिवदास मुळगावकर, वेळगे सरपंच सामंता कामत, सुर्ला सरपंच विश्र्रांती सुर्लकर, कुडणे सरपंच राजन फाळकर, न्हावेली सरपंच कालिदास गावस, आमोणा सरपंच कृष्णा गावस, हरवळे सरपंच राजू मळीक, तसेच भाजपचे कार्यकर्ते, महिला प्रतिनिधी, हितचिंतक यांनी भरपूर शुभेच्छा दिल्या. यानिमित्ताने खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.









