संसदेत संमत झाल्यावर होणार अनेक बदल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूरच्या मुद्द्यावरून गोंधळ होत आहे. परंतु अशा स्थितीतही सरकारने बुधवारी लोकसभेत जन्म आणि मृत्यू नोंदणी (दुरुस्ती) विधेयक, 2023 सादर केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वतीने हे विधेयक केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मांडले आहे. हे विधेयक आवाजी मतदानाने लोकसभेत संमत झाले आहे.
या विधेयकात कुठल्याही शैक्षणिक संस्थेत प्रवेश, ड्रायव्हिंग लायसेन्स, मतदारयादी, आधार क्रमांक, विवाह नोंदणी किंवा शासकीय नोकरीतील नियुक्तीसाठी एकल दस्तऐवज म्हणून जन्म प्रमाणपत्राच्या वापराची अनुमती देण्याचा प्रस्ताव आहे. नोंदणीकृत जन्म अन् मृत्यूंचा एक राष्ट्रीय अन् राज्यस्तरीय डाटाबेस तयार करण्यास हे विधेयक सहाय्यभूत ठरणार आहे.









