मुंबई
कंपनीची संघटीत बांधणी करण्यासोबत नेतृत्वाबाबत महत्त्वाचे पाऊल उचलणाऱ्या बिर्ला सॉफ्ट कंपनीचा समभाग शेअरबाजारात मंगळवारी तेजीत असताना दिसला. मंगळवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान कंपनीचा समभाग 7.49 टक्के वधारत 331 रुपयांवर पोहचला होता. सलग तिसऱ्या सत्रात कंपनीचा समभाग तेजी राखून होता. गेल्या एक महिन्याच्या अवधीत समभाग 27 टक्के इतका वाढला आहे.









